Tuesday 16 August 2011

पाहिले आकाश नेहमी घरट्यातून
धिर नाही मनी वाटे जावे उडून

उंच उन्च उडावे 
कोठे संपत हे आभाळ बघुनी यावे

उडाया शिकवे चिमणाई 
चिमणाबाबा विचारांना पंख देई

एके दिवस मारली भरारी
पहाया धरणी हि सारी

हळु हळु हे कळले मला
आंत नाही या आभाळाला

मन आता म्हणे सगळे सोड 
लागे घरट्याची ओढ

मागे वळून पहा जरा
संध्या झाली परत फिरा

वाट पाही चिमणाबाबा 
चिमणा आई हाक मारी
अपुले घरटे नाही दुसरे कोठे
ओलांडली हि धरती सारी

या आकाशाला पक्षी आहे अनेक
चिमणा आई बाबांना मी एक 

1 comment:

  1. m speechless... there is nothing like 'home sweet home'

    ya akashala pakshi anek
    chimna aai baba na me ek...

    beautiful lines

    ReplyDelete